शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र वितरकांचे जीवन अधिक कष्टप्रत ! शेखर चरेगावकर; कºहाडात वृत्तपत्र, दूध वितरकांचा मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:34 IST

कऱ्हाड : ‘ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता वेळेत वृत्तपत्र व दूध पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र व दूध वितरकांकडून केले जाते. या व्यक्ती अनेक अडचणींवर मात करीत आपला व्यवसाय

कऱ्हाड : ‘ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता वेळेत वृत्तपत्र व दूध पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र व दूध वितरकांकडून केले जाते. या व्यक्ती अनेक अडचणींवर मात करीत आपला व्यवसाय करीत असतात. यातील वृत्तपत्र वितरकांचे जीवन हे कष्टप्रत आहे. त्यांनी आपल्यात बदल घडविणे आज गरज आहे,’ असे मत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केले.

कऱ्हाड येथे वृत्तपत्र वितरक व दूध वितरक यांचा सोमवारी सायंकाळी स्नेहमेळावा पार पडला. याप्रसंगी शेखर चरेगावकर बोलत होते. मेळाव्यास महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, प्रमुख वृत्तपत्र वितरक मिलिंद भंडारे, महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटना सरचिटणीस बालाजी पवार, विनोद पन्नासे, कोल्हापूर संघटनेचे सचिव रघुनाथ कांबळे, किरण वणगुत्ते, गोरख भिलारे, यशवंत बँकेचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत चव्हाण, यशवंत बँकेचे

मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, नगरसेवक घनश्याम पेंढारकर, मुकुंद चरेगावकर प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विके्रता संघटनेच्या वतीने राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा सत्कार केला.

बालाजी पवार म्हणाले, ‘वृत्तपत्र विक्रीबरोबर इतर व्यवसायही करणे आज वितरकांपुढे काळाची गरज बनली आहे. वर्षाचे ३६५ दिवस हे वृत्तपत्र वितरक काम करीत असतात.’ सुनील पाटणकर म्हणाले, ‘लवकरच वृत्तपत्र व दूध वितरकांना अच्छे दिन येतील. वर्धा शहरात ३५ हजार वृत्तपत्रांचे वितरण केले जाते. वृत्तपत्र वितरण व्यवसायाबरोबर दुसरे कोणकोणते व्यवसाय तसेच सेवा देता येतील? याचा विचार संघटनेच्या माध्यमातून सध्या केला जात आहे.’ यावेळी कऱ्हाड येथील प्रमुख वृत्तपत्र वितरक मिलिंद भंडारे यांनीही मनोगत व्यक्त केले.जीवाचीही भीती वाटत नाही : विनोद पन्नासेशासन व सरकार ज्या ठिकाणी पोहत नाहीत. त्या ठिकाणी वृत्तपत्र वितरक पोहचतात. अशी परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील वीस ते तीस किलोमीटर अंतर जंगलात जाऊन वृत्तपत्रे देताना नक्षवाद्यांचाही विचार करीत नाही. कधी कुठून गोळी लागेल याचा सुद्धा साधा आम्ही विचार करीत नसल्याची माहिती चंद्रपूर येथून आलेले विनोद पन्नासे यांनी यावेळी मेळाव्याप्रसंगी उपस्थितांना दिली.कऱ्हाड येथे सोमवार सायंकाळी वृत्तपत्र व दूध वितरकांचा मेळावा पार पडला. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, विकास सूर्यवंशी, बालाजी पवार, गोरख भिलारे, मिलिंद भंडारे आदी उपस्थित होते.